वासामुंडी येथील सल्ला गांगरा बांधकामाचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते भूमिपूजन
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
◆एटापल्ली◆:तालुक्यातील वासामुंडी येथे मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज वास्तव्यास असून गावात आदिवासी समाजाचे प्रतीक असलेल्या सल्लागांगराचे बांधकाम करावयाचे असल्याचे गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी व समाज बांधवांनी चर्चा करून सल्ला गांगराचे बांधकाम करण्याचे ठरविले होते.
एटापल्ली तालुक्यात भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम हे दौऱ्यावर असतांना त्यांनी वासामुंडी या गावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी भेट दिले असता त्या गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व आदिवासी समाज बांधवांनी गावात आपल्या आदिवासी समाजाचे प्रतीक असलेल्या सल्ला गांगरा चे बांधकाम करावयाचे असल्याचे माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या जवळ बोलून दाखवले.यावेळी माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी सल्ला गांगरा बांधकाम नियोजित जागेची त्यांनी पाहणी केली. यावेळी आदिवासी समाज बांधवांनी सल्लागांगराच्या बांधकामाची भूमिपूजन करण्याची विनंती केली असता,समाज बांधवांच्या विनंतीला मान देऊन माजी आमदार आत्राम यांनी त्यांच्या हस्ते सल्ला गांगराचे भूमिपूजन केले. व यावेळी त्यांनी आदिवासी समाज बांधवांना या बांधकामासाठी आपल्यापरीने आर्थिक मदतही दिली.
या भूमीपूजन सोहळ्याला माजी आमदार आत्राम यांचे समवेत माजी जि.प.सदस्य संजय चरडुके,गाव भूमिया दुलसा लेकामी,दिवाकर गावडे,राकेश आत्राम,विश्वनाथ मडावी,गुरुदास आत्राम,अनिल आलाम,बंडू लेकामी,लालू लेकामी,आविस तालुका उपाध्यक्ष श्रीकांत चिप्पावार, जुलेख शेख,विनोद कावेरी,दिलीप आलाम सह बिआरएस व आविसचे पदाधिकारी मोठ्या संख्यने उपस्थित होते.