सिरोंचा शहरातुन असरअल्लीकडे जाणाऱ्या मार्गावरील खड्डे येत्या दहा दिवसांत बुजवा … अन्यथा आंदोलन ..!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
सिरोंचा शहरातील असरअल्ली या गावाकडे जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते फारेस्ट गार्डन पर्यंत या रस्त्यावर अनेक मोठं मोठे खड्डे पडले असून या खड्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास होत असून अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यताही असल्याने या रस्त्यावरील खड्डे दहा दिवसाचे आत न बुजविल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार)गटाने दिली आहे.
सिरोंचा नगर पंचायत हद्दीतील असलेल्या हा रस्ता आरडा पेंटीपाका,अंकीसा, आसरअल्ली,पातागुडेम,आदी गावांसह छत्तीसगड राज्याकडे जाणारी मुख्य रस्ता असून या गावांमधील नागरिक दररोज शासकीय कामांसह रुग्णालय तसेच शालेय विद्यार्थी आणि गर्भवती महिला याच रस्त्याने सिरोंचा मुख्यालयाला येत असतात.परंतु मागील अनेक महिन्यांपासून ही रस्ता खड्यांनी माखलेला आहे.तरी संबंधितांचे या रस्त्याचे दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष होत आहे.येत्या दहा दिवसाचे आत जर या रस्त्यावरील खड्डे बुजविल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रा.कॉ.(शरद पवार)गटाने दिली आहे.
खड्डे बुजविण्याचे निवेदन सिरोंचाचे तहसीलदार व नगर पंचयातचे प्रभारी मुख्याधिकारी शिकतोडे यांना देतांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) गटाचे जिल्हा सरचिटणीस कृष्णकुमार चोक्कमवार, तालुका उपाध्यक्ष सागर मूलकला यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते आणि ऑटोचे वाहन चालक -मालक व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.