किष्टापूर येथील अलोणे कुटुंबाला माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्याकडून उपचारासाठी आर्थिक मदत..!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
अहेरी
…तालुक्यातील किस्टापूर(जिमलगट्टा) येथील मदनय्या अलोने यांचा काही दिवसा अगोदर अपघात झाला
होता या अपघा
तात मदनय्या अलोने
हे गंभीर जखमी झाले होते.त्यांच्यावर
तेलंगणातील करीमनगर
येथे
एका खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहे.
अलोणे यांची घरची
परिस्थिती
अत्यंत हलाकीची आहे,
त्यांना खाजगी दवाखान्यात उपचार घेण्यास
आर्थिक अडचण
होत
आहे
म्हणून
आज सरिता अलोने यांनी आलापल्ली येथे भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या
त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन आपली परिस्थिती सांगीतल्यावर माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी उपचारासाठी आर्थिक मदत करून करीमनगर येथिल
भारत राष्ट्र समितीचे नेत्याना सहकार्य करण्यास सांगितले.यावेळी मोनिका
अलोने,बबलू शेख,विनोद कावेरी,जुलेख शेख,संदीप बडगे,सुधाकर
कोरेत
उपस्थित होते.