सिरोंचा शहरातील शिवाजी चौक ते असरअल्ली रस्त्यावरील खड्डे न बुजविल्यास बेमुदत साखळी उपोषण
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
सिरोंचा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नॅशनल हायवे – फारेस्ट गार्डन पर्यत मुख्य रस्त्यावरील खड्डे दहा दिवसात बुजवा अन्यथा आंदोलन करणार अशी तालुक्यातील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि बाधित ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदार जितेंद्र सिकतोडे यांना निवेदन देऊन ०४ सप्टेंबर २०२३ रोजी मागणी करण्यात आली होती.तहसीदारांना दिलेल्या
निवेदनात म्हटले होते की , या रस्त्यावरून यें-जा करतं असताना खड्ड्यात पडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही,
त्या रस्त्यावरून ग्रामीण भागातून विध्यार्थी आणि वृद्ध महिला, आणि गर्भवती महिलांचे मुख्यालयात येण्या- जाणे करतात , या गंभीर विषयांची दाखल घेऊन त्वरित खड्डे बुजवा अशी मागणी करण्यात आली होती.
मात्र शासनाकडून आजपर्यंत या रस्त्यावरील खड्डे बुजविताना दिसून आले नाही.
त्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)पक्षाच्या वतीने येत्या १८ तारखेला तहसील कार्यालय समोर साखळी उपोषणाला बसून आंदोलन करत असल्याचे सांगितले आहे, आणि तहसील कार्यालयात तसे पत्रही देण्यात आले.
अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष सागर मूलकला यांनी मीडियावर दिली आहे.
त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस कृष्णकुमार चोक्कामवार ,कार्यकर्ते सलमान शेख, सडवली मेडीजेर्ला, विनोद नायडू, राजू मूलकला, चिरंजीव एलपुला,रमेश गादम उपस्थित होते.