अहेरीत दोन दिवसीय तालुकास्तरीय फुलोरा प्रशिक्षण संपन्न
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क अहेरी….
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांचे निर्देशानुसार अहेरी तालुक्यातील शिक्षकांसाठी दोन दिवसीय फुलोराचे प्रशिक्षण गटसाधनकेंद्र अहेरी यांचे व्दारा स्थानिक माॅडेल स्कूलमध्ये आयोजित करण्यात आले.प्रशिक्षणाचे औपचारिक उद्घाटन गटशिक्षणाधिकारी धनंजय कांबळे यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख उपस्थिती फुलोरा समन्वयक दिगांबर दुर्गे ,विषय साधन व्यक्ती सुषमा खराबे यांची होती.प्रास्ताविक दिगांबर दुर्गे यांनी केले.संचालन रामदास कोंडागुर्ले यांनी केले तर उपस्थितीतांचे आभार निलेश कोडापे यांनी मानले.याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी धनंजय कांबळे यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थी शिक्षकांना मार्गदर्शन केले.
**प्रशिक्षणाचा टप्पा चार मध्ये तालुक्यातील 85 जि.प.शाळेतील 168 शिक्षक या प्रशिक्षणाचा लाभ घेणार आहेत.फुलोरा प्रशिक्षणातून विद्यार्थीच्या मुलभुत क्षमतांचा विकास कसा साधला जाईल व विद्यार्थीना गुणवत्तापुर्ण व दर्जेदार शिक्षण कसे दिले जाईल यासाठी प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे.भाषा विषयातील 40 क्षमता व गणित विषयाच्या 22 क्षमता कशा विकसीत केल्या जातील.यासाठी शाळामध्ये बाल भवनाची निर्मिती करुन त्यात विविध शैक्षणिक साहित्या ठेवले जातील याचा वापर विद्यार्थी स्वत: कसा करतील विषयीचे मार्गदर्शन फुलोरा तालुका समन्वयक दिगांबर दुर्गे,रामदास कोंडागुर्ले,निलेश कोडापे यांनी प्रशिक्षणार्थी शिक्षकांना केले .
नवीन शैक्षणिक धोरण 2020 च्या शैक्षणिक धोरणानुसार 2027 पर्यंत देशातील सर्व मुलांना पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान हे मुख्य उद्दीष्ट आहे.यासाठी फुलोरा हा शैक्षणिक प्रकल्प पुरक असल्याने जिल्ह्य़ातील आता सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांचा सामाविष्ट करण्यात आला आहे.
तात्कालिन मुख्यकार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद यांचे संकल्पनेतून फुलोरा हा शैक्षणिक प्रकल्प मागील तीन वर्षांपासून जिल्ह्य़ातील काही निवडक शाळेत राबविला जात आहे.फुलोरा शैक्षणिक प्रकल्पातून जिल्ह्य़ातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थींचा भाषा व गणित विषयातील शैक्षणिकस्तर वाढला असल्याने या वर्षांपासून जिल्ह्य़ातील सर्वच शाळातुन फुलोरा हा शैक्षणिक उपक्रम राबविला जाणार आहे याचा फायदा नक्कीच जिल्ह्य़ातील विद्यार्थीना होईल असा विश्वास गटशिक्षणाधिकारी धनंजय कांबळे यानी व्यक्त केले.
“फुलोरा हा शैक्षणिक प्रकल्प विद्यार्थीच्या मुलभूत क्षमता विकसीत करण्यासाठी फार उपयुक्त ठरत आहे.2020 च्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार 2027 पर्यंत सर्व मुलांना पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान हे उद्दिष्ट साध्य करायचे आहे यासाठी जिल्ह्य़ात सुरु असलेला फुलोरा हा शैक्षणिक प्रकल्प फार महत्त्वाचा आहे त्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे करण्याचा प्रयत्न केला जात आहे.”
धनंजय चापले
प्राचार्य डायट गडचिरोली.