अहेरी बस आगाराचे कर्मचाऱ्यांकडून जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा सत्कार…!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
अहेरी : माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या अहेरी येथील बस आगाराचे कर्मचाऱ्यांकडून नुकताच सत्कार करण्यात आला.सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे की, आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी नुकतेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केले होते.
या निमित्य अहेरी आगारातील कर्मचाऱ्यांनी आज अजयभाऊ जनसंपर्क कार्यालय येथे अजय कंकडालवार यांची भेट घेऊन त्यांची शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले.व पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे,माजी जि.प.सदस्य अजय नैताम, नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगमसह आविसं व काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच बस आगाराचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.