भगतनगर येथील महानाम संकीर्तन व भागवत प्रवचन कार्यक्रमाला माजी आमदार दिपक दादा आत्राम यांची उपस्थिती…!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
मूलचेरा:- तालुक्यातील भगत नगर येथील सार्वजनिक श्री श्री राधागोविंद भजन मंदिर येथे आयोजित अष्टमप्रहार महानाम संकीर्तन व भागवत प्रवचन कार्यक्रमाला भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी उपस्थित राहून पूजन करत आशीर्वाद घेतले.
मुलचेरा तालुक्यात बंगाली बांधवांची संख्या मोठी असून येथील विविध गावात दरवर्षी मोठ्या प्रमाणात धार्मिक कार्यक्रम घेतले जातात.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भगत नगर येथे अष्टमप्रहार महानाम संकीर्तन व भागवत प्रवचन च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.दिनांक 18 ते 21 जानेवारी दरम्यान आयोजित कार्यक्रमास माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी मंदिरास भेट देऊन विधिवत पूजन करत आशीर्वाद घेतले. यावेळी मंदिर कमिटीचे अध्यक्ष मनोमली बिस्वास,संजय बॅनर्जी, पुलोक तालूकदार,परिमल मंडल,सुनील मंडल, तपोष गांगुली,रामपदो मिस्त्री,सुधीर तालुकदार,सुनील कर्णधार,वेलगुर उपसरपंच उमेश मोहूर्ले,माजी सरपंच विजय कुसनाके,जुलेख शेख,संदीप बडगे,विनोद कावेरी,प्रवीण रेषे सह बीआरएस व आविस चे पदाधिकारी उपस्थित होते.