जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते ध्वजारोहण तसेच ध्वजारोहण कार्यक्रमांना उपस्थिती…!
स्वतंत्र दिनानिमित्त अनेक ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न..!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क …प्रतिनिधी…
अहेरी : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते व लोकप्रिय माजी जिल्हा अध्यक्ष तथा कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभहस्ते आज १५ ऑगस्ट रोजी स्वतंत्र दिनानिमित्त कंकडालवार यांच्या स्वगावी इंदाराम येथील मुख्य चौकातील,कस्तुरबा गांधी महिला बालिका विद्यालय येथे ध्वजारोहण करण्यात आली.तसेच भगवंतराव हायस्कूल इंदारम आणि जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथील ध्वजा रोहण कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित राहून स्वातंत्र्य दिनाच्या स्थानिक नागरिकांना तसेच गडचिरोली जिल्ह्यातील समस्त जनतेला शुभेच्छा दिल्या.
यावेळी इंदाराम ग्राम पंचायतीचे सरपंच वर्षा पेंदाम,उपसरपंच वैभव कंकडालवार,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य गुलाबराव सोयाम,ग्राम पंचायत सदस्या सपना कोरेत,कविता सोयाम, जयाबाई तेलंगे,विनोद आलाम,शालिनी कांबळे,शाखिर शेख,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,ढवस मॅडम,केंद्र प्रमुख पुल्लूरवार,रोशन सामलवार,अक्षय बत्तूलवार,सदाशिव दुर्गे पो.पाटील,मडावी मॅडम आरोग्य सेविका,श्रीनिवास कोत्तावडलावार,प्रकाश मज्जेरवार,वसंत मेश्राम,प्रमोद गोडसेलवार,आवेश दुर्गे, मामिडलवार ,पत्तीवार सर,नामदेव आत्रामसह स्थानिक नागरिक तसेच शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.