मेडिगड्डा प्रकल्प बाधितांसह अतिवृष्टीग्रस्त व महापुरग्रस्तांना अतिशीग्र नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी !

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क…गडचिरोली…
*माजी आमदार दिपक दादा आत्राम
यांची
मुख्यमंत्री शिंदे यां
ची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली मागणी*
*गडचिरोली*....यावर्षी माहे जुलै व आगस्ट या महिन्यात झालेल्या अतिवृष्टी तसेच मेडिगड्डा - कालेश्वर सिंचन प्रकल्पाचे बॅक वाटर आणि तिन्ही नद्यांना आलेल्या महापुरामुळे सिरोंचा तालुक्यातील तब्बल 21 गावतील शेतकरी व सर्वसामान्य नागरिक प्रभावीत झाले असून या 21 गावातील अतिवृष्टी, पूरग्रस्त व प्रकल्पबाधितांना सरकार कडून अद्याप नुकसानीचे आर्थिक मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे तालुक्यातील
सर्व बाधितांना अतिशीग्र आर्थिक मदत देण्याची मागणी आविस नेते व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल मुंबई येथे मंत्रालयात भेट घेऊन त्यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे.
माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून चर्चेअंती त्यांना दिलेल्या निवेदनात, सिरोंचा तालुक्यातील 21 गावातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांची अतिवृष्टी, पूर व प्रकल्पाचे बॅक वाटरमुळे घरे,शेती,गुरे ढोरे व शेळ्यांचे नुकसान झाले असून प्रशासनाने पूर व प्रकल्पाबाधितांना 2 ते 3 आठवडे सुरक्षित स्थळी हलविले असून पुराचे भीतीने आज ही काही गावातील नागरिक राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला तात्पुरत्या स्वरूपाचे झोपड्या बांधून वास्तव्याने राहत आहे. जिल्हा प्रशासनाने बाधित गावांची पंचनामे करून शासन स्तरावर कळविले आहे. संबंधित समस्याला आपण गांभीर्याने घेऊन अतिवृष्टीग्रस्त,पूरग्रस्त व मेडिगड्डा कालेश्वर सिंचन प्रकल्पबाधितांना नुकसानीचे आर्थिक मदत अतिशीग्र मिळवून देण्याची मागणी केली आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी आमदार दिपक आत्राम यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे माहिती असून मुख्यमंत्र्यांसोबत भेटीदरम्यान माजी आमदार दिपक आत्राम यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाचही तालुक्यातील ज्वलंत समस्या मुख्यमंत्र्याच्या निदर्शनास आणल्याची विश्वसनीय माहिती आहे.