तमंदाला फाटा ते अमडेल्ली व अमडेल्ली ते झिंगाणुर पर्यंत पक्का रस्ता बांधकाम करण्याची मागणी !
विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क …सिरोंचा…
*आविसंचे जनगम सडवली यांची मागणी*
सिरोंचा ….तालुक्यातील कोपेला ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या अमडेल्ली ला जाण्यासाठी तमंदाला फाट्यापासून अमडेली या गावापर्यंत आज ही कच्चा रस्ता असून व अमडेली ते झिंगाणुर पर्यंत कच्चा रस्ता असल्याने अमडेल्ली या गावातील नागरिकांना सिरोंचा मुख्यालय व झिंगाणुर ला ये-जा करण्यासाठी अधिकच त्रास होत असल्याने या गावाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तमंदाला फाटा ते अमडेल्ली व झिंगाणुर पर्यंत पक्का रस्ता बांधकाम करण्याची मागणी आदिवासी विद्यार्थी संघाचे या क्षेत्रातील मुख्य कार्यकर्ता जनगम सडवली यांनी केली आहे. तमंदाला फाटा ते अमडेल्ली या गावाचे केवळ 12 कि.मी.आहे.सदर रस्ता हे पूर्णतः कच्चा असल्याने या गावातील नागरिकांना सिरोंचा मुख्यालयाला येण्यासाठी चिटूर ते वडधम वरून सिरोंचा असे 34 कि.मी.अंतर गाठून सिरोंचाला यावे लागत आहे .यामुळे या गावातील आदिवासी बांधवांची आर्थिक नुकसानीसह शारीरिक नुकसान ही होत आहे.या गावातील आदिवासी बांधवांची देवाण-घेवाण हे झिंगाणुर गावाशी निगडीत असल्याने या गावाला जाण्यासाठी हि पक्का रस्ता नाही आहे.
अमडेल्ली पासून झिंगाणुर हे गाव केवळ नऊ कि. मी.अंतरावर आहे. अंमडेल्ली हे गाव आदिवासी बहुल असून आजही विकासाच्या दृष्टीने मागासलेले आहे.या गावाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दोन्ही रस्त्यांची खडीकरण करून पक्का रस्त्याची बांधकाम करणे आवश्यक असून अमडेल्ली या गावातील नागरिक रोज तालुका मुख्यालयाला संजय गांधी,वृद्धपकाळ योजनेची अनुदानासाठी व अन्य शासकीय कामासाठी आणि शालेय विध्यार्थी ये-जा करीत असतात.करिता राज्य सरकार व संबंधित विभागाने या गंभीर समस्याकडे लक्ष देऊन वरील दोन्ही रस्त्यांची खडीकरणासह पक्का बांधकाम करण्याची मागणी आदिवासी विद्यार्थी संघाचे मुख्य कार्यकर्ते जनगम सडवली यांनी केली आहे.