येमली येथील नागरिकांसोबत माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी साधला जनसंवाद !
विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क ….एटापल्ली.
माजी
आमदार
आत्राम
यांच्या जनसंवाद
सभेला नागरिकांची प्रचं
ड गर्दी
एटापल्ली…तालुक्यातील अतिदुर्गम ,नक्षलग्रस्त व मागासलेल्या येमली येथील नागरिकांसोबत आविस नेते व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी जनसंवाद साधत समस्या जाणून घेतल्या.यावेळी येमली येथील नागरिकांनी माजी आमदार दिपक आत्राम यांना आरोग्य,सिंचन,रस्ते,वनहक्के दावे,शिक्षण,रोजगार असे अनेक ज्वलंत समस्या मांडल्या. येमली येथील नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक समस्यावर तोडगा काढू,आणि येमली गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे उपस्तित नागरिकांना ग्वाही दिली.
.
माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या जनसंवाद सभेला येमलीकरांनी प्रचंड गर्दी केली.येमली येथे पार पडलेल्या माजी आमदार आत्राम यांचेसमवेत माजी जि.प.सदस्य संजुभाऊ चरडुके,अजय मडावी,दिलीप वेलादी, राम तलांडी, परमेश्वर वेलादी, जलपती आलम, प्रवीण आत्राम,महादेव गावडे दौलत आलाम, माजी सरपंच विजय कुसनाके, जुलेख शेख,संदीप बडगे सह आविस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्तीत होते.