दोडगिर (दौड)येथील व्हॉलीबॉल सामन्याचे माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
अहेरी तालुक्यातील ग्रा.प.किस्टापुर दौड अंतर्गत दोडगिर (दौड) येथे बिरसा मुंडा ग्रामीण व्हॉलीबॉल सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर क्रिडा स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून देण्यात येत आहे.तर द्वितीय पारितोषिक गंगाधर मडावी जिल्हा अध्यक्ष कास्ट्राईब कर्मचारी संग व सुधीर मडावी ग्रामसेवक यांच्या कडून देण्यात येत आहे.तृतीय पारितोषिक योगेश मडावी तथा रामा मडावी यांच्या कडून असे तीन पारितोषिक या स्पर्धेसाठी देण्यात येत आहे.सदर स्पर्धेचे लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते उदघाटन करण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कारेजी रापंजी हे होते.
यावेळी उपस्थित सुरेखा आलाम माजी सभापती प.स.अहेरी,शांता सिडाम सरपंच पेटा,सिडम सर दोडगेर जी प शाळा,सुनीता मडावी,शामराव गावळे, आनंद जियाला,वल्लीताई वेलादी,चिंना तलांडे, बड्डे वेलादी माजी सरपंच ,किशोर मडावी,चंदू मुलकारी,सानू मडावी, आविसंचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.