Gamesगडचिरोली जिल्हा

कोलपल्ली येथील ग्रामीण व्हॉलीबॉल सामन्याचे माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

कोलपल्ली येथे आयोजित व्हॉलीबॉल सामन्याचे माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन सोहळा पार पडला .

यावेळी उपस्थित खेळाडु व नागरीकांना मार्गदर्शन करतांना माजी जि. प.अध्यक्ष कंकडालवार यांनी म्हणाले कि,युवकांमध्ये सुप्त गुण दडलेले आहेत ते सुप्त गुण प्रदर्शित करण्यासाठी असे क्रिडा सम्मेलन घेणे गरजेचे आहे,मात्र या साठी शासनाकडून निधी उपलब्ध होत नाही पण युवकांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी आदिवासी विद्यार्थी संघाकडून प्रत्येक गांवात पुरस्कार देत असतो,खेळ खेळत असताना हार-जीत होत असते मात्र आपण हरलो म्हणून खचून जाऊ नये विजय एक दिवस आपली पण होऊ शकतो तसेच पुढे बोलताना म्हणाले ग्रामीण असो किंवा शहरी असो प्रत्येक ठिकाणी व्हॉलिबाल स्पर्धा आयोजीत करण्यात येत आहेत प्रत्येक ठिकाणी आदिवासी विद्यार्थी संघाकडून पारितोषिक देत असताना आम्हचा एकच उद्देश्य आहे.युवकांना खेळण्यासाठी एक व्यासपीठ तयार झाले पाहिजे व एक चांगल खेळाडू तयार झाले पाहिजे तेव्हाच तर आपल्या गावाच्या व तालुक्याच्या नावलौकीक होत असतो.हे होत असताना गावातीला सामाजिक,शैक्षणिक,व विकासाबाबतीत चर्चा घडून येत असते व समस्याच्या निराकरण होत असते असे मत व्यक्त केले.अहेरी तालुक्यातील कोलपल्ली येते जय पेरसापेन प्रसन्न 750 पि. आर.सि. कोलपल्ली यांच्या वतीन भव्य ग्रामीण व्हॉलीबाल स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाला बोलत होते.

यावेळी मंचावर माजी जि. प.सदस्य श्री.अजयभाऊ नैताम, माजी जि.प.सदस्य सुनीता कुसनाके,महेश लेकूर सदस्य ग्रा.प.देवलमरी, प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी, राकेश सडमेक,व्येकटेश चालूरकर,दिवाकर गावळे,शंकर चालूरकर, व्येकटेश गावळे,संपत आईलवार, दीपाताई मडावी,गंगुबाई सोयाम,बिचु वेलादी आदी गावातील नागरीक उपस्थित होते.

सामान्यांच्या यशस्वितेसाठी मंडळाचे अध्यक्ष : मनोज सोयाम ,उपाध्यक्ष : राजकुमार चालूरकर सचिव : विशाल सोयाम,कोशाध्यक्ष : पुरुषोत्तम आईलवार सहसचिव : मिथुन येरमे व मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य गण गावकरी महिला वर्ग उपस्थित होते..!!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close