एटापल्ली तालुक्यातील बुर्गी येथील व्हॉलीबॉल व क्रिकेट सामन्यांचे माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
एटापल्ली तालुक्यातील बुर्गी येथील सम्राट क्रीडा मंडळ बुर्गी यांच्या वतीने भव्य ग्रामीण कब्बड्डी व व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन केले होते.सदर स्पर्धेसाठी पहिला दुसरा व तिसरा असं विजेता संघांना पुरस्कार देण्यात येत आहे. या दोन्ही स्पर्धांचे उदघाटन लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला.
माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी उद्धघाटनिय भाषणात म्हंटले की, युवक देशाचे आधारस्थंभ आहेत युवकांनी सामाजिक, शैक्षणिक क्रीडासह प्रत्येक क्षेत्रात अग्रनी राहून विकास व प्रगतीचा धुरा सांभाळल्यास निश्चितच गाव तालुका जिल्ह्याचं नावं कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. युवक देशाचे आधारस्थंभ असून युवकांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असल्याची ग्वाही लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयदादा कंकडालवार यांनी उपस्थितांना दिली.
यावेळी सम्राट क्रीडा मंडळाचे पदाधिकारी ,सदस्यागण,खेडाळू व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.