आदिवासी समाजाने आपल्या संस्कृतीच्या माध्यमातून चांगले संस्कार घडवून आणावे !
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
📝अहेरी-…. धर्म आणि संस्कृती माणसाला जगण्याची दिशा देतात त्यामुळे प्रत्येक समाजातील लोकांनी आपले धर्म आणि संस्कृतीचे चिकित्सक दृष्टीकोन तपासणी करून चांगल्या गोष्टीचे जतण केले पाहिजे, त्यातूनच आपल्या समाजतल्या येणाऱ्या पिढीला चांगले संस्कार आपल्याला देता येईल अन तसे संस्कार प्रत्येकांनी घडवूनही आणले पाहिजे, असे प्रतिपादन भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी केले. ते अहेरी तालुक्यातील चिरेपली येथील आदिवासी समाजाचा प्रतिक असणाऱ्या सल्लागागरा व वीर बाबूराव शेडमाके यांच्या स्मारकाच्या उदघाटन सोहळ्याप्रसंगी विशेष अतिथी यास्थानावरून बोलत होते.
कार्यक्रमाला उदघाट्क म्हणून बीरसा बिग्रेडचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीशदादा पेंदाम होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून खाँदला सरपंच सुमन आलाम,राजाराम सरपंच नागेश कन्नाके,मेडपली सरपंच निलेश वेलादी,आलापल्ली माजी सरपंच विजय कुसनाके,जुलेख शेख,विनोद कावेरी,वशील मौकाशी यावेळी गावातील समितीचे अध्यक्ष भगवान मडावी,सचिव सतीश मडावी,मुकुंद सोयाम,धर्मा पेंदाम,अशोक मडावी,सांबा मडावी,गणपत आलाम,येरा मडावी,चंद्रु आलाम,बापू कुमरे,लालू पेंदाम,चिनू तलांडी,मुसली कुमरे पुजारी,पोटी कुमरे,चंद्रा आलाम,नारु पेंदाम,सिताराम ईष्टाम,रविंद्र सोयाम,बिचु सोयाम,परशुराम सोयाम,रमेश तलांडी,पोलीस पाटील रघुनाथ मडावी,रावजी गावडे,गोपीनाथ गावडे,लता पेंदाम,भगवान मडावी,भगवान तलांडी,वासुदेव कुमरे,विनोद तलांडी,रामसिंग आलाम,ग्राप सदस्य किशोर आलाम,ग्राप सदस्या ज्योती आलाम, दुर्गा आलाम,रंगा आलाम,अशोक आत्राम,पांडुरंग गावडे,वंदना अलोने,ग्राम पंचायत सचिव सडमेक मॅडम, वनरक्षक सडमेक उपस्थित होते.तसेच या कार्यक्रमाला या भागातील खांदला राजाराम, रायगट्टा ,गोलाकर्जी मरनेली कोत्तगुडाम परीसरातील आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.