येंन्काबंडा येथील नागरिकांसोबत माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी साधला संवाद
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
अहेरी ….तालुक्यातील ग्राम पंचायत कार्यालय गोविंदगाव अंतर्गत येणाऱ्या येन्काबंडा येते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी दौरा करून गावातील नागरिकांसोबत संवाद साधून गावातील विविध समस्या जाणून घेतल्या. यावेळी गावातील नागरिकांनी गांवात निर्माण झालेल्या पाण्याची समस्या,गली रस्ते,नाली व पुल,आदि प्रमुख समस्या असल्याचे यावेळी नागरिकांनी सांगितले.तसेच येतील नागरिकांनी मुख्य चौकात बैठक घेवुन चर्चा केली सदर चर्चेत विविध समस्या मांडण्यात आले असता समस्यांची निराकरण करण्यात येईल असे सांगितले.
यावेळी गोविंदगाव ग्राम पंचायतचे सरपंचा कु.शंकरीबाई पोरतेट,पंचायत समितीचे माजी सभापती श्री.भास्कर तलांडे,माजी सभापती सौ.सुरेखा आलाम,गोविंदगावचे उपसरपंच श्री.तिरुपती अल्लूरी,नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,माजी सरपंच परशुराम नैनी,भगवान कोडापे,नरेंद्र गरगम,आलाम पाटील,माजी उपसरपंच संजय पोरतेट,जयराम आत्राम व गावातील नागरिक उपस्थित होते.