व्येंकटापूर येथील जि.प.शाळेचे नवीन वर्गखोलीचे लोकार्पण सोहळा संपन्न
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
अहेरी ….जिल्हा परिषद गडचिरोली पंचायत समिती अहेरी अंतर्गत व्येंकटापूर येथे जिल्हा परिषद शाळा असून इयत्ता १ली ते ४ थी पर्यत शिक्षण असून विध्यार्थी शिक्षण घेत आहेत मात्र या शाळेची वर्गखोलीच्या कमतरता असल्याने विद्यार्थ्याना शिक्षण घेण्यासाठी अडचण होत होती.माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडे मागणी केली असता,जि.प.अध्यक्ष म्हणून पदावर असताना त्यांनी जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत सदर वर्ग खोली मंजूर करून भूमिपूजन करण्यातआले होते शाळेचे बांधकाम पूर्णत्वास आल्यामुळे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. सदर लोकार्पण सोहळ्या च्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आवलमरी ग्रामपंचायतचे सरपंच सुनंदा कोडापे होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित कुकलारे (PSI)आवलमरी,वैकना कोडापे शाळा व्यवस्थापन अध्यक्ष, चिरंजीव चिलवेलवार उपसरपंच आवलमरी,मारोती मडावी ग्रा.प.सदस्य,विमलाबाई छटारे,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी, ग्रा.प.सदस्य,जेगय्या परकीवार,नानाजी मुरमाडे, द्रुपद मुरमाडे,दामोदर मुरमाडे, वासुदेव सिडाम,धनंजय सुनतकर,प्रकाश दुर्गे,राकेश सडमेक तसेच गावातील महीला पुरुष उपस्तीत होते.