नागुलवाडी येथील क्रिकेट व व्हॉलीबॉल सामन्याचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
एटापल्ली....तालुक्यातील नागुलवाडी येथे नव महाराष्ट्र क्लब कडून आयोजित भव्य ग्रामीण कबड्डी व व्हॉलीबॉल या दोन्ही सामन्याचे उदघाटन नुकताच भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आला.
नगुलवाडीया उदघाटन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून पोलीस पाटील माधव गावडे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प.सदस्य संजयभाऊ चरडुके,नागुलवाडी सरपंच सविताताई दुर्वा,नागुलवाडी उपसरपंच सैनु गावडे,हालेवारा उप पोलिस स्टेशन चे प्रभारी देवकर साहेब,माजी प.स.सदस्य मंगेश हलामी, आविस तालुका सचिव नानेश गावडे,आविस तालुका उपाध्यक्ष श्रीकांत चिप्पावार,जुलेख शेख,विनोद कावेरी,माजी सरपंच नानसु नरोटे,गेसोजी आलाम,सैनूजी,गावडे,राजेश सुरमवार,गोसू हलामी,विलास गावडे,शामराव गावडे,पांडू नरोटे,राजू गावडे,शामराव आलामी, विनोद गावडे,अशोक दुर्वा,रामा गावडे सह आविसचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी उपस्थित खेळाडू व नागरिकांना कबड्डी व व्हॉलीबॉल या दोन्ही मैदानी खेळाविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. भव्य ग्रामीण कबड्डी व व्हॉलीबॉल या दोन्ही सामन्यासाठी प्रथम व द्वितीय पुरस्कार माजी आमदार दिपक दादा आत्राम यासह या दोन्ही सामन्यासाठी इतर मान्यवरांकडून अनेक आकर्षक पुरस्कारही ठेवण्यात आले. नागुलवाडी येथील नव महाराष्ट्र क्लब कडून आयोजित कबड्डी व व्हॉलीबॉल या दोन्ही सामन्याचे यशस्वीतेसाठी दिपक हलामी,उमेश गावडे,शामराव हलामी,गणेश दुर्वा,किशोर हलामी,बालाजी हलामी,दिनेश गावडे, अशोक दुर्वा यांनी परिश्रम घेतले. उदघाटनीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार उमेश गावडे यांनी मानले.या उदघाटनीय सोहळ्याला नागुलवाडी सह परिसरातील नागरिकांची बहुसंख्येने उपस्थित होते.