शिक्षण महर्षी बब्बू हकीम व चाचम्मा हकीम यांच्या तब्यातीची माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्याकडून विचारपूस
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
अहेरी...वनवैभव शिक्षण मंडळाचे सचिव,आदिवासी सेवक व शिक्षण महर्षी बब्बू हकीम व त्यांच्या धर्मपत्नी चाचम्मा हकीम यां दोघांची भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची आस्थेने विचारपूस केले. एकेकाळी अख्या गडचिरोली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळवून देणारे तसेच अहेरी विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षाला नवीन ओळख निर्माण करून देणारे आणि वनवैभव नावाची शिक्षण संस्था स्थापन करून विधानसभा क्षेत्रातील सर्वसामान्याना शिक्षणाची दारे खुले करून देणारे अब्दुल रहीम उर्फ बब्बू हकीम हे मागील काही वर्षांपासून बिमार असून आज त्यांच्या तब्येतीची माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी त्यांच्या राहते घरी भेट घेऊन तब्येतीची आस्थेने विचारपूस केले. यावेळी अहेरी तालुका काँगेस अध्यक्ष पप्पू हकीम,आलापल्ली माजी सरपंच विजय कुसनाके,अहेरी आविस शहराध्यक्ष मिलिंद अलोने,जावेद अली,जुलेख शेख,विनोद कावेरी,मुक्तदिर शेख,नफी पठाण,मुन्ना हकीम उपस्थित होते.