सुद्धागुडम येथील टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे बक्षिस वितरण सोहळा संपन्न
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क ….
✍️ अहेरी:- तालुक्यांतील सुध्दागुड्म येते जी.एस.के, क्रीडा मंडळ च्या वतीने भव्य टेनिस बाल क्रिडा स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले होते.
सदर क्रिडा स्पर्धेसाठी पहिला पारितोषिक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून देण्यात आले आहे.तर दुसरा पारितोषिक पंचायत समितीचे माजी सभापती श्री.भास्कर तलांडे व शामराव गावडे यांच्या कडून देण्यात आले.
सदर स्पर्धेचे एकूण ३० संघ भाग घेतले होते आज शेवटचा दिवस अंतिम सामना सुध्दागुड्म विरुद्ध उमानूर यांच्यात रंगला असुन प्रथम पारितोषिक सुध्दागुड्म संघाला तर दूसरा पारितोषिक उमानूर संघाला मिळाला असुन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री अजयभाऊ कंकडालवर यांच्या कडून व अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती श्री भास्कर तलांडे,यांच्या कडुन होता.
सदर बक्षीस वितरण उमानूर चे माजी सरपंच ताराबाई आसाम,लक्ष्मीस्वामी अठेला,शंकर गावडे,शामराव गावडे,इरसाद शेख,चिरंजीव गंधार्ल्रा,राजू बोरकूठे,श्रीनिवास मडावी,लालू गेडाम,महेश येलकुची,लक्ष्मण वेलादी,विलास सालपला यांच्या उपस्थिति वितरण करण्यात आली
यावेळी मंडळचे अध्यक्ष,उपअध्यक्ष मंडळचे सदस्यगण व गावातील महिला व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.