सिरोंचा तालुका

झिंगानूर येथील कॅन्सरग्रस्त युवतीला माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्याकडून आर्थिक मदत

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

◆सिरोंचा◆* : तालुक्यातील झिंगानूर येथील कु.ललिता मडावी हिला कॅन्सर या गंभीर आजाराने ग्रासले असून तिची घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची आहे, आवश्यक उपचार घेण्यास आर्थिक अडचण होत आहे.ही बाब तालुक्यातील आविस पदाधिकाऱ्यांनी भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर दौऱ्यावर असतांना त्यांच्या कानी टाकले असता माजी आमदार दिपकदादा आत्राम आपल्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन कॅन्सरग्रस्त ललिता मडावी यांच्या घरी भेट देऊन त्यांची तब्बेतीची आस्थेने विचारपूस करून पुढील उपचारासाठी आर्थिक मदत दिली. झिंगानूर येथील कॅन्सरग्रस्त युवतीला उपचारासाठी आर्थिक मदत करतांना माजी आमदार दिपकदादा आत्राम यांचेसोबत आविस सिरोंचा तालुकाध्यक्ष बानय्या जनगम,उपसरपंच शेखर गणारापू,सामाजीक कार्यकर्ता भारत मडावी,श्रीराम मडावी,ग्राप सदस्य बोडका गावडे,ग्राप सदस्य कैलास आत्राम,मोहन कुळमेथे,दुर्गेश लंबळी,चिंतामान कुळमेथे, बाबुराव कुम्मरी,समय्या कोंडागोर्ला,कारे मडावी,राकेश गावडे,सुरेश कुम्मरी,श्रीनिवास कुम्मरी,समय्या कोंडागुर्ला,तिरुपती कुम्मरी,अमन कोंडागुर्ला,कैलास मडावी सह आविस व बिआरएस चे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close