सिरोंचा तालुका

सिरोंचा येथे शारदीय नवरात्रोत्सवा निमित्य गरबा नृत्य स्पर्धेचे आयोजन..!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

सुधाकर सिडाम
तालुका प्रतिनिधी सिरोंचा

सिरोंचा:-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवानेत्या व माजी जिल्हापरिषद अध्यक्षा तथा गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य भाग्यश्रीताई हलगेकर(आत्राम) यांच्या सौजन्याने सिरोंचा येथे शारदीय नवरात्रोत्सव निमित्य गरबा नृत्याचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत भाग्यश्री आत्राम यांच्याकडून अनुक्रमे प्रथम,द्वितीय आणि तृतीय असे बक्षिशे ठेवण्यात आले असून इच्छुक गरबा संघांनी या स्पर्धेत  भाग घेण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आली आहे.

      शारदीय नवरात्री उत्सवात स्त्रीयांमधील कला गुणांना वावं मिळावे म्हणून सगळी कडे गरबा नृत्याचे आयोजन करण्यात येत असतात.म्हणून यंदा सिरोंचा शहरात ही गरबा नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व गरबा प्रेमींनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवून स्पर्धा यशस्वी करण्याचे आयोजकांनी केली आहे.सिरोंचा येथे गरबा नृत्य स्पर्धा हे कार्यक्रम शनिवारी ता(२१ऑक्टोबरला)सायंकाळी ८:००वाजता क्रीडा संकुल सिरोंचा येथील सभागृहात पार पडणार आहे.या कार्यक्रमाला प्रवेश फी मोफत शुल्क करिता गरबा आवड असलेल्या सर्व संघांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे व गरबा नृत्याचे आनंद घ्यावा असे आवाहन आयोजक टायगर ग्रुप सिरोंचा कडून  करण्यात येत आहे.

इच्छुक संघांनी खालील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा:-
(९४२१८५७१५०)
(९४०४९३५१६९)
(८२७५४७४७६७)
(७७८०६२३८४४)
(९४०४८४२८९८)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close