अहेरी तालुका
नंदिगाव येथील आलम कुटुंबीयांची कंकडालवार यांच्याकडून सांत्वन व आर्थिक मदत..!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क …प्रतिनिधी
अहेरी : तालुक्यातील नंदिगाव येथील रहिवासी रवींद्र बापू आलम यांची आज दुःखद निधन झाले होते.निधनाची वार्ता स्थानिक कार्यकर्त्यांकडून काँग्रेस नेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना कळताच त्यांनी तात्काळ मृतकाच्या घरी जाऊन आलम कुटुंबाची आस्थेने विचारपूस करून सांत्वन केले.तसेच मृतकाच्या अन्त्याविधी कार्यक्रमासाठी आलम कुटुंबाला आर्थिक मदत ही केले.
यावेळी देवलमरी ग्रामपंचायतचे उपसरपंच हरीश गावडे,संदीप दुर्गे,शंकर तोरेम,रमेश आलम,सुधाकर आलम,वनिश आलम,नानेश सिडाम,आनंदराव सिजम,लसम्मा सिडाम,श्रनिवास राऊत,गजनान मडावीसह स्थानिक कार्यकर्ते तसेच गावकरी उपस्थित होते.