काँग्रेस नेते कंकडालवार व मडावी यांच्या नेतृत्वात वनहक्कधारक शेतकऱ्यांची तहसील कार्यालयावर धडक …!
वनहक्क धारकांच्या मृत्यूनंतर वारसानांची फेरफार करण्याची मागणी.
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क …प्रतिनिधी….
अहेरी : वेलगुर वनपरिक्षेत्रातल्या वनहक्क धारक शेतकऱ्यांनी काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार आणि हनमंतू मडावी यांच्या नेतृत्वाखाली अहेरी येथील तहसील कार्यालयावर धडक देऊन तहसीलदारांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.
यावेळी काँग्रेस नेते कंकडालवार आणि मडावी यांनी वनहक्क धारक शेतकऱ्यांची समस्या तहसीलदारांना विस्तृतपणे समजावून सांगत शेतकऱ्यांची समस्या तात्काळ सोडविण्याची मागणी केले.
अहेरीचे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात,वेलगुर येथील संबंधित तलाठी वनहक्क धारक शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर वरसानाचे नाव नोंद घेण्यास टाळाटाळ करीत असल्याने त्यांना योग्य समज देण्यात यावी तसेच वारसांनाचे नोंद घेण्यास त्यांना योग्य आदेशीत करून शेतकऱ्यांचे मागण्यांकडे डोळेझाक करणाऱ्या संबंधित तलाठी विरुद्ध कारवाईची सुध्दा मागणी करण्यात आली आहे.
अहेरीचे तहसीलदार यांना निवेदन देतांना काँग्रेस नेते कंकडलवार व मडावी यांचे सोबत सुरेश येरम,मधुकर येरम,नामदेव मडावी,किसन सडमेक,जगनाथ कुळमेथे,देवाजी सडमेक,संतोष सडमेक,महादेव कुळमेथे,अमसा कुळमेथे,मलेश सडमेक,मोतीराम सडमेक,गणपत सडमेक,श्रीकांत कुळमेथे,मुकेश कुळमेथे,निलेश करपेत,टरिभाऊ आलम,राकेश टेकाम,भगवान बोर्यम,सुनीता करपेत,कमला आत्राम,शकुंतला बोर्यम,सुमिगा टेकाम आदी वनहक्क धारक शेतकरी उपस्थित होते.