अहेरी तालुका

राजपूर पॅच येथील वनहक्क धारकांची सुनावणीसाठी नागपूरला रवाना…!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क ….प्रतिनिधी…

अहेरी : अनेक वर्षांपासून वनहक्क पट्टे मिळण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या अहेरी तालुक्यातील राजपूर पॅंच येथील वनहक्क धारकांची प्रकरणे जिल्हास्तरीय समितीने वनहक्क नाकारल्याने या नागरिकांनी उपविभागीय समितीकडे अपील केले होते.त्यानुसार अनेक वनहक्क धारक नागरिक नागपूर येथील उपविभागीय आयुक्त कार्यालयाकडे आपली बाजू मांडण्यासाठी नागपूरला रवाना झाले. या सगळ्यांची काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभा समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी जाण्या – येण्यासाठी वाहनांसह जेवणाची सुध्दा त्यांनी व्यवस्था करून दिली आहे.

अहेरी तालुक्यातील राजपूर पॅच परिसरातील अनेक नागरिकांचे वनहक्काचे दावे २०२१ मध्ये जिल्हास्तरीय समितीने फेटाळले होते.त्यामुळे व्यथित होऊन या नागरिकांनी न्याय मागण्यासाठी उपविभागीय वनहक्क समितीकडे अपिल केले होते.त्यावर उपविभागीय वनहक्क समितीचे सचिव तथा अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग नागपूर यांनी सुनावणीसाठी उपविभागीय आयुक्त कार्यालयात हजर राहण्याची सूचना केली होती.

त्यामुळे येथील नागरिक आपल्याकडील पुराव्यांसह नागपूरसाठी रवाना झाले.सुनावणीसाठी हजर होणे आवश्यक असल्याने अजयभाऊ कंकडलावार यांनी सर्वांसाठी चारचाकी वाहनांची व्यवस्था करून दिली.त्यामुळे त्यांनी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडलावार यांचे आभार मानत आपल्याला आता योग्य न्याय मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close