अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या …!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
गडचिरोली – भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर यांच्या जिल्हास्तरीय अंदाजानुसार गडचिरोली जिल्ह्यात कालपासून सर्वत्र वादळी वारासह अवकाळी पावासाने हजेरी लावल्याने यात शेतकऱ्यांची मिरची,कापूस व धान पिकांची खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती असून या पीक नुकसानीची शासन व प्रशासनाकडून तात्काळ दखल घेऊन पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई मिळवून देण्याची मागणी आविसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी केली आहे.जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडत असून प्रशासनाने कोणीही घराबाहेर पडू नये असे पूर्वसूचना दिल्याने प्रशासनाने केलेल्या आव्हानला नागरिकांनी सहकार्य करुन कोणीही घराबाहेर पडू नये.असेही आव्हान माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केली आहे.