सामाजिकसिरोंचा तालुका
रंगधामपेठा येथे मुलकाला फाऊंडेशन कडून नेताजी सुभाषचंद्र बोस यांची पुण्यतिथी कार्यक्रम साजरा..!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
सिरोंचा तालुका मुख्यालयापासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या
रंगधामपेठा या गावात मूलकाला फाउंडेशन कडून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
रंगधामपेठा या गावात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला मूलकाला फाउंडेशनचे अध्यक्ष सागर भाऊ मूलकाला आणि त्यांचे टीम तसेच गावातील नागरिकांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मौन धारण करत अभिवादन केले.
यावेळी मूलकाला फाउंडेशनचे सदस्य उदय मूलकला, राजू मूलकला, कल्याण मूलकला, अनिल दुर्गम, नवीन अकुदरी, संतोष मूलकला, राजेश तालरी, तसेच रंगधामपेठा गावातील युवा कार्यकर्ते नागराजू कटला,मल्लय्या जोडे सह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.