एटापल्ली तालुका
वासामुंडी येथील स्व.शांताराम तलांडे यांचा तेरवी कार्यक्रमाला माजी आमदार दिपक दादा आत्राम यांची उपस्थिती
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
◆एटापल्ली◆: तालुक्यातील वासामुंडी येथील प्रतिष्ठित व्यक्ती हनमंतू तलांडे यांचा मुलगा शांताराम तलांडे यांचा अपघातात दुःखद निधन झाला होता.
या दुःखद घटनेची माहिती भारत राष्ट्र समितीचे नेते, आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांना मिळताच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत तेरवी कार्यक्रमाला उपस्थित राहुन हनमंतु तलांडे यांचे कुटुंबियांचे सांत्वन केले. सांत्वन व तेरवी कार्यक्रमाला माजी आमदार दिपक दादा आत्राम सोबत माजी जि.प.सदस्य संजयभाऊ चरडुके,आविस सल्लागार डोलेश तलांडे,आविस तालुका उपाध्यक्ष श्रीकांत चिप्पावार, आल्लापल्ली ग्राम पंचयातचे माजी सरपंच विजय कुसनाके,जुलेख शेख,विनोद कावेरी,दिलीप आलाम,राकेश आत्राम,निखिल मडावी,रमेश तलांडे व मोठया प्रमाणात गावकरी व आविस पदाधिकारी उपस्थित होते.